७) सौभाग्य व ती ! कशाचा तरी आवाज झाला आणि नयनला जाग आली. तिने घाबरलेल्या अवस्थेत आजूबाजूला बघितले. काही दिसत नव्हते पण अंगाचा ठणका होत होता ही जाणीव प्रकर्षाने झाली. कारण त्या रात्रीही सदाने त्याचा प्रताप दाखवलाच होता. अनेक विषारी दंश करून तो तिकडे प्रभाकडे गेला होता. सकाळ झाली म्हणजे... त्या रात्रीही विषारी प्याला तिने पचविला होता. बाहेर चांगलेच फटफटले होते. उठून कामाला लागणं भाग होते कारण मामेसासरे गेल्यापासून सासूने अंथरूण धरले होते. तिचेही सारे नयनला करावे