महती शक्तीपिठांची भाग १३ १८) शारदा शक्तिपीठ काश्मीर इथे सती आईचा उजवा हात पडला . पाकिस्तानमध्ये सरस्वती देवी हे एक महाशक्तीपीठ “शारदापीठ” म्हणून ओळखले जाते . हिंदूंचे हे सर्वात मोठे तीर्थ स्थान आहे . पाकिस्तानच्या ताब्यात असलेले व काश्मीरमध्ये वसलेले हे प्राचीन हिंदू मंदिर ज्याला शारदापीठ सांस्कृतिक स्थळ म्हणतात ते ५००० वर्ष जुने आहे . सनातन परंपरेच्या अनुसार नीलम नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या मंदिराचे महत्व सोमनाथच्या शिवलिंग मंदिरा इतकेच मानले जाते . हे मंदिर भारतीय नियंत्रण रेषेपासून १७ मैल दूर आहे . पाकव्याप्त कश्मीरच्या शारदा गावातील या मंदिराच्या ठिकाणी आता फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत . विदयेची अधिष्ठात्री असलेल्या हिंदू