कादंबरी- जिवलगा ...भाग - ३८ वा

(13)
  • 12.8k
  • 1
  • 6.6k

कादंबरी – जिवलगा भाग -३८ वा ------------------------------------------------------------------------------ निराशेने हेमूच्या मनाला वेढून टाकलेले असतांना ..मामाचा आलेला फोन .आणि आज संध्याकाळी मुकामाला येतो आहे..या बातमीने हेमूच्या मनाला मोठा धीर आल्या सारखे वाटू लागले . “बुडत्याला जसा काडीचा आधार पुरेसा असतो असे म्हणतात “ अगदी तसेच झाले होते हे. मामाचे मुक्कामी येणे ..ते पण एकट्याने ..याचा नक्कीच आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो . या उलट जर मामी आणि मामा दोघे ही आजच आले असते तर ..परिस्थिती तितक्शी अनुकूल राहिली नसती . मुख्य म्हणजे ..मामीने पसंत करून ठेवलेली आणि उदयाला जिला पाहण्याचा कार्यक्रम ठरला आहे, तिच्याबद्दल मामाकडून माहिती पण घेता येणार होती