लक्ष्मी - 9

  • 12k
  • 6.6k

लक्ष्मीची जिद्द उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागणार ही बातमी ऐकल्यापासून लक्ष्मी खूपच बेचैन होती. किती मार्क मिळतील ? नव्वद टक्केच्या वर मिळाले तर मेडिकलला जावेच लागेल, नव्वद टक्केच्या खाली मिळाले तर दुसरा पर्याय विचार करता येईल. लक्ष्मीने पक्का निर्धार केला होता की, काही झाले तरी मेडिकलला जायचे नाही. ती रात्रभर त्याच विचारात झोपी गेली. त्याच विचारात गुंग असल्याने रात्री तिला रक स्वप्न पडले. स्वप्नात तिने पाहिलं की, बारावीच्या परीक्षेत तिला 95 टक्के गुण मिळाले त्यामुळे तिच्या बाबांनी तिला मेडिकलला पाठविण्याचा विचार केला. मेडिकलसाठी पहिल्याच वर्षी पाच ते सहा लाख रुपये लागणार होते. त्यासाठी मोहनने आपली एक एकर शेत