पेरजागढ- एक रहस्य.... - 3

  • 14.7k
  • 7.1k

३) मृत्यूचे आगमन...पेरजागडची छवी मनात ठेवून मी त्या दुसऱ्या दिवशी सकाळीच परत आलो. आज कितीतरी दिवसांनी मनामध्ये परत एकदा असमर्थता जाणवत होती. खरं तर ती माझं प्रेम होती. आणि आजही मी तिच्यावर तितकंच प्रेम करत होतो जितकं आधी करत होतो. मी कित्येक वेळा तिला विसरण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमलं ... जेव्हां आज इतक्या दिवसांनी ती मला भेटली तर साहजिकच ती माझ्या मागावर असणार.आणि शेवटी ती माझ्या मित्राला घेवुन ती माझ्या घरी आलीच.काय झालं काय आहे?काय चाललंय तुझं?मी तुला कालच सांगितलं गडावर.ते माझं उत्तर नाही पवन.. आज खरं खरं सांग ... चार वर्ष झाली आज... मी पण निश्चय केला आहे...