जुळले प्रेमाचे नाते-भाग-८१।।

(12)
  • 11.2k
  • 1
  • 2.9k

चालत आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही जाताच राजने माझा हात त्याच्या हातात घेतला आणि मला एका चेअरवर बसवलं. हे सर्व काही माझ्यासाठी नवीन होत. आणि खरतर मी खूपच अस्वस्थ होते. कारण राज हे सगळं का करत होता हे मला काही केल्या कळत नव्हतं. कारण हे आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी करतो हे माहीत होतं. पण राज माझ्यासाठी का करतोय आणि कशासाठी हे मात्र कळत नव्हतं. त्यानंतर तो ही समोर बसला. आम्ही बसताच एका वेटर ने आमच्यासाठी खायला वाढलं. दोन ग्लासात ऑरेंज ज्यूस ओतला. "अरे राज माझं जेवण झालं आहे..." "हो, माहीत आहे. मी पाहिलं ना तू किती जेवलीस ते. निशांतच्या प्रकारामुळे तु