आदर्श आपल्या दैनंदिन रोजच्या कामावर जायला निघाला. दररोज तो याच मार्गाने जात होता. तो एका टोल नाक्यावर कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून कामावर होता. तो सकाळी आठ वाजता आपला डब्बा घेऊन निघाला. दररोज त्याच रस्त्याने जात असल्याने तो रस्ता परिचित होता. वाटेत एक शंकराचे मंदिर पडत होते, त्यांच्यासमोर सरकारी दवाखाना रस्त्याला लागूनच होता. पण आज आदर्श रस्त्यांना जाताना शंकराच्या मंदिराच्या बाजूने असलेल्या फुटपाथवर दोन निरागस चेहरे दिसले. आदर्शाने गाडी उभी ठेवली, तो स्तब्ध झाला होता. त्या चेहऱ्याकडे पाहून. तो इकडे तिकडे सैरभावाने पाहू लागला. हे निरागस चेहरे कुणाचे आहे म्हणून...! तो गाडीवरून उतरून आजूबाजूला लक्ष करत होता.