अंजली एका श्रीमंत, प्रतिष्ठित, खात्या-पित्या पाटलाच्या घरात जन्मलेली मुलगी होती तिला कधीच कोणत्या गोष्टीची कमी नव्हती ती मागेल ते, मागेल तेव्हा तिला मिळत होते, तिचे वडील बँकेत नोकरीला होते, अमाप पैसे होते, गावाकडे शेतजमीन, मोठी प्रॉपर्टी होती, मोठ्या व्यवसाय होता त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना कोणत्याच गोष्टीची कधीच कमी पडू दिली नाही. अंजली लहान असतानाच ते पुण्यात येऊन स्थित झाले, पुण्यात येताच त्यांनी मोठ्ठे तीन बीएचकेचे घर विकत घेतले, मुलं लहान होती पण जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांना घर लहान वाटले नाही पाहिजे. सुरूवातीला तिच्या वडिलांना जास्त पगार नव्हता पण त्यांना गावाकडून प्रत्येक गोष्टी आयत्या मिळत होत्या, गावाकडे तीन