घरगुती हिंसाचार

  • 14k
  • 1
  • 4k

लग्नानंतरचा तिसरा दिवस होता तो. देवदर्शन करून सगळी मंडळी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरी आली होती. दोन दिवस जेवणाची व्यवस्था बाहेरच झाली असल्याने आज रात्रीचे जेवण घरी बनवावे लागणार होते. आल्याआल्या सासूच्या आज्ञेप्रमाणे रेखाने भरभरून कपडे बदलले आणि हातपाय धुवून स्वयंपाकघरात आली.रेखा तशी बऱ्यापैकी सुगरण होती. त्यामुळे पहिल्यांदा सासरी जेवण बनवण्याचा उत्साह तिच्या हालचालीत दिसून येत होता. सासूबाई मागून येऊन जेवणाचा बेत सांगू लागल्या. कोणते सामान कुठे आहे वगैरे समजून घेतल्यावर रेखा जेवण बनवण्याच्या तयारीला लागली.जेवण बनवताना सासूबाई मागे उभ्या राहून संपूर्णपणे मार्गदर्शन करत होत्या. जेवण जरी रेखा बनवत असली तरी कोणती गोष्ट कश्याप्रकारे बनवायची, किती तिखट टाकायचे, तेल