कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -५ वा

  • 10.6k
  • 4.9k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग -५ वा ---------------------------------------------------------------- यशच्या घरची सकाळ अगदी साडेपाचला होते , सकाळचे फिरणे , असे फिरून आल्यावर बंगल्याच्या भवती मोठ्या प्रेमाने फुलवलेली बाग, त्या बागेतील झाडांना पाणी देणे , देवपूजेसाठी ताजी फुले तोडून ठेवणे .. या कामात गुंतणे घरातील प्रत्येकला आवडते . त्यामुळे ..या विषयावर त्यांच्यात रोज वाद होतात ..आज माझा नंबर आहे , मी झाडांना पाणी देणार .. कारण .बागेत जी झाडे आणि वेली आहेत ..त्या यातल्या एकेकाने आणून लावल्या आहेत ..त्यामुळे बागेंत फिरून झाडांना पाणी देणे हे सगळ्यांचे आवडते काम. यशचे बाबा रिटायर्ड झाले आणि त्यांनी हे काम स्वतःच्या हातात घेत ..सांगून टाकले ..