जुळले प्रेमाचे नाते-भाग-८०।।

  • 9.6k
  • 2.9k

आम्ही बोलत असताना आम्हाला राज चे खूप सारे फ्रेंड्स दिसले जे बाहेरून खास त्याच्या बर्थडेसाठी भारतात आले होते.. एका मोठया टेबलावर ते सगळे आणि राज बसला होता. अचानक तो उठुन आमच्याकडे आला आणि आम्हा दोघांना त्याने त्याच्या सोबत बसायला सांगितले.. हो, नाही करत आम्ही सोबत गेलो.. मग आम्ही कोण.., ते कोण असा छोटासा इन्ट्रो झाला. त्यात एक मुलगी होती.. कर्ली शॉर्टहेअर्स, डार्क ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पीस घातलेली. बोलण्यात तरबेत होती.... ती "सोनिया" होती. राजची लहानपणीची अब्रॉडची फ़्रेंड. सर्वांच्या गप्पा चालु होत्या. पण तिची सारखी नजर मात्र निशांतवर येऊन थांबत होती.. हे मी मात्र चांगलंच हेरलं होत. गप्पा चालू असताना