स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 3 )

(13)
  • 9.3k
  • 1
  • 5.5k

अजब दस्तुर है दुनिया का जो जमाणे से परे है बेटी का हर गुनाह माफ है बहु की गलती भी गुनाह है नित्या रात्रीचा स्वयंपाक आवरून एकटीच बसली होती ..खर तर तिला खूप भूक लागली होती पण मृन्मयच्या आधी जेवण करणं तिच्या सासूबाईंना पटलं नसत त्यामुळे ती पोटावर हात धरत त्याची वाट पाहू लागली ..रात्रीचे सुमारे 11 वाजले होते जेव्हा दारावर थाप पडली ..त्याचे आई बाबा बाहेर इतरांशी गप्पा मारत बसले होते ..नित्याने धावत जाऊन दार उघडले ..मृन्मय अगदीच तिच्या समोर उभा होता आणि चेहऱ्यावर होत ते हसू ..त्याने रूम मध्ये यायला पाऊल टाकले आणि लगेच अडखळला ..त्याचा पाय