चंचल

  • 8k
  • 2.1k

मध्यमवर्गीय कुटुंबातली असली तरी आईवडिलांनी तिला लाडात वाढवलेले होते. बालपणापासूनचे तिचे सगळे हट्ट विनातक्रार पुरवले गेले होते. कदाचित एकुलती एक असल्यामुळे तसे होणे स्वाभाविक वाटत होते. अर्थात त्यामुळेच तिच्या आईवडिलांसाठी ती लाडकी होती. पाठवणी करताना आईला हुंदका आवरत नव्हता. पाहुण्यांशी बोलता बोलता वडिलांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. तरीही स्थळ छान मिळाल्यामुळे आईवडील समाधानी होते.नाही म्हणायला तिच्या आईवडिलांना काळजी एकाच गोष्टीची वाटायची. ती म्हणजे तिच्या हातात सतत असलेला मोबाईल. आईवडिलांच्या मते तिने मोबाईलवरची खाटखूट थोडी कमी करावी, शिवाय सोशल मीडियावरचा वापर प्रमाणात करावा. पण आपलं मत त्यांनी कधीही तिच्यावर थोपण्याचा प्रयत्न केला नाही.नव्या काळातील नव्या विचारांची चंचल नावाप्रमाणेच चंचल होती.