आता बाबा मागे आईजवळ बसले होते आणि मी पूढे निशांतसोबत.. रेडिओवर मस्त रोमँटिक गाणी लागली होती.. मी लगेच गाडीची काच खाली घेतली.. सूर्य ही परतीच्या प्रवासाला लागला होता.. चहुबाजूने पसरलेली त्याची गुलाबी, हलकी निळी, मधेच लाल-पिवळी किरणं पसरली होती.., तर मधेच कुठेतरी गोबरे गाल असलेले ढग मधे-मधे गुसु पाहत होते... मधेच एकत्र येत होते तर मधेच धावत होते जस काही त्या पसरलेल्या लाल-गुलाबी अग्नीमधुन स्वतःला वाचवत असावेत... आम्ही ही आता अलिबागच्या जवळ पोहोचत होतो.. जसजशी गाडी पुढे जात होती.. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची हलकीशी हुळूक खिडकीतून अंगाला स्पर्शून जात होती.. तो खारटपणा उगाचच त्रास देत होता. पण थंड वारा काही खिडकी