महती शक्तीपिठांची भाग ९ ४९)विराट- भरतपूर अंबिका शक्तीपीठ हे शक्तीपीठ राजस्थानमधील विराट नगर, भरतपूर येथे आहे. राजस्थानची राजधानी जयपुर ,ज्याला गुलाबी नगरी म्हणून ओळखले जाते . या नगरीच्या उत्तरेस महाभारतकालीन विराट नगराचे प्राचीन विध्वंस झालेले अवशेष आहेत . त्या जवळ एक गुहा आहे , ज्याला भीम की गुफ़ा म्हणले जाते . याच विराट गावात हे शक्तिपीठ स्थित आहे . या ठिकाणी आई सतीच्या डाव्या पायाची बोटे पडली . इथे आईचे रुप “अंबिका”असुन सोबत शिवशंकर “अमृत” रुपात विराजमान आहेत . जयपुर आणि अलवर या दोन्ही ठिकाणा पासुन विराट ग्राम इथे जाण्यासाठी मार्ग आहेत . भरतपुरला लोहागढ़ या नावाने ओळखले जाते .