जुळले प्रेमाचे नाते-भाग-७८।।

  • 10.1k
  • 2
  • 3.2k

सकाळी लवकरचं मला जाग आली. आणि का नाही येणार. जर तुम्हाला माहीत असेल की तुमचा आवडता व्यक्ती तुमच्यासोबत एकाच घरात आहे. हा, आता जवळ नाही. पण एकाच छताखाली..... मग कसली झोप आणि कसलं काय..!! माझं ही अगदी तसचं झालं होतं. निशांत इकडे असल्याने मला आज लवकरच जाग आली. आणि ती देखील आईच्या हाकेशिवाय... असो. "होता है कभी कभी।।....." लवकर उठुन मस्त काही तर बनवेल अस ठरवुन बाहेर आले खरं... पण मी लेट होते किचनमध्ये पोहोचायला... कारण आई आज लवकरच उठली होती आणि तिने सगळा नाश्ता ही तय्यार केला होता. ते बघून माझा थोडा हिडमुस झालेला. मग आईनेच मला निशांतला उठवायला