लक्ष्मी - 5

(13)
  • 20.4k
  • 1
  • 10.9k

लक्ष्मी आली घराकु कूच कु कोंबड्याच्या आरवण्याने मोहनला जाग आली. तसा तो अंथरुणातून उठला, आपले सकाळचे सर्व कार्य आटोपून शहराकडे निघाला. आज स्वारी मजेत होती. मनातल्या मनात गाणे गुणगुणत तो जात होता. दुकानासमोर आपली सायकल लावली, आत गेला. मध्ये गेल्याबरोबर त्याच्या कानावर एक वाईट बातमी आली, त्याच्या मालकाला सकाळी दवाखान्यात घेऊन गेले. आपला डबा दुकानात ठेवला आणि दवाखान्याकडे सायकलवर निघाला. मनात खूप विचार येत होते, काय झालं असेल मालकाला ? कोणता त्रास आहे ? कसे असतील ते ? विचाराच्या तंद्रीत तो दवाखान्यात आला. अतिदक्षता विभागात मालकांना ठेवण्यात आले होते आणि बाहेर त्यांची पत्नी बसली होती. मोहनला पाहताच ती ओळखली आणि