तुझाच मी अन माझीच तू...भाग १०

(19)
  • 15.1k
  • 8k

तुझाच मी अन माझीच तू...भाग १० आभा चे बोलणे ऐकून आईला हसूच आले. आभा तशी लहानपणापासूनच भांडखोर आणि स्वतःच्या मत बद्दल ठाम होती. आभा मध्ये काहीच बदल झालेला नव्हता. आईने आभा ला छोटा फटका मारला, "काय ग भांडत असतेस सारखी... आता काय लहान आहेस का सारखी भांडण करायला?" "आई... यु नो, मी माझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगत आलीये.. कोणाची अरेरावी किंवा गळेपडूपना का सहन करू ग.. तुम्हीच तर बनवलं मला इंडिपेंडन्ट..." चहा चा घोट घेत आभा बोलली.. "हो हो.. माहितीये पण सारखी भांडू नकोस ग आभा.. मैत्री कर लोकांशी... मग तेच मित्र आपल्या बरोबर राहतात जन्मभर.."