असंगाशी संग

  • 12.1k
  • 2.5k

असंगाशी संग... गोष्ट 1992-93ची आहे,त्यावेळी मी पुण्यातल्या कॅम्प भागात कार्यरत होतो. माझ्याकडे पुण्यातल्या काही पेठांमध्ये टेलिकॉम नेटवर्कउभारणी,देखभाल तसेच वेटिंगलिस्ट मधील लोकांना नवीन टेलिफोन जोड द्यायची जबाबदारी होती.त्या काळी केवळ लँडलाईन सेवाच आस्तित्वात होती शिवाय त्यासाठी चारपाच वर्षांची वेटिंग लिस्ट असायची. ग्राहकांना सेवा देताना त्यांच्या तक्रारींचे निवारण करत असताना त्या त्या भागातल्या छोट्यामोठ्या पुढारी मंडळींशी चांगले संबंध ठेवावे लागायचे.त्यातच खात्याची एक टेलिफोन एडव्हाईजरी कमिटी असायची.ही कमिटी म्हणजे राजकीय पक्षातल्या असंतुष्ट कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याची एक सोय होती.या कमिटीच्या मेम्बर्सकडून जी कामे सुचवली जायची त्यातली नियमात असलेली कामे त्वरीत करावीत असा संकेत होता त्यामुळे या लोकांची मर्जी सांभाळावी लागायची.पुण्यातल्या एका पेठेत