जुळले प्रेमाचे नाते-भाग-७७।।

  • 10.5k
  • 1
  • 3.3k

"ब्लॅक टीशर्ट मध्ये तर.. हाय मे मर जावा...!!" अस बोलून मी आरशातल्या निशांतची लांबुनच नजर काढली आणि स्वतःच काम करत बसले.. स्वतःच्या धुंदित मी स्वताच काम आवरलं आणि निघाले... बाहेर नाश्ता करायला बसले असता आईने विषय काढला... "अग एकटीच आलीस का..??? निशांत कुठे आहे..??" मी हातातला कांदेपोह्यांचा चमचा खाली ठेवत आईकडे पाहिलं.... "अशी प्रश्नार्थक चेहऱ्याने काय बघत आहेस प्राजु..! निशांत कधीपासून तुझ्या रूममधे आहे. तु बोलली नाहीस का त्याच्याशी..?? तु अंघोळीला गेलीस म्हणून बाहेर आलेला.. त्यानंतर तुझ्या चाहुलीने परत आता गेला होता. दिसला नाही का तुला..???!!" आई जे काही बोलत होती ते मला काहीच ऐकू जात नव्हतं. मी हातातले पोहे