जुळले प्रेमाचे नाते-भाग-७६।।

(12)
  • 10.3k
  • 1
  • 3.2k

माझे ओले केस मी टॉवेलने बांधले होते. एका हातात चहाचा कप घेऊन मी रूममधे आले. "अजून हा झोपला आहे..!! किती हा आळशीपणा...!! "खडूस उठ ना... आता काय रविवारचे बारा वाजवणार आहेस का..???" तरीही हा चादर डोक्यावर घेऊन घेऊन झोपत होता. मी चहाचा कप टेबलावर ठेवला आणि माझे ओले केस त्या टॉवेलमधून मोकळे केले... त्या पिक्चर च्या हिरोईन सारखं करत मी ही माझे केस झटकले.. त्या ओल्या केसांमधल पाणी जाऊन निशांतच्या चेहऱ्यावर एखाद्या कारंज्यासारख उडाल... "काय ग हनी-बी झोपू दे ना मला... रोज लवकर उठुन जातो ना ग ऑफिसला. आज रविवार आहे. आणि मी झोपणार आहे..." निशांत चादर घेऊन परत झोपला...