सोहम च बोलणं ऐकून, नीशाला फार मोठा धक्का बसला .हा सोहम नक्की काय बोलतोय? तो जे बोलतोय ते नक्की खरं आहे की नाही ? का हा माझी मस्करी करतोय . तो जे बोलतोय ते जर खरं असेल तर, मी काय करू? सोहम असं का वागला असेल? त्या अंजलीच्या पोटातील मुलाशी एवढा कसा सोहमला लळा लागला ? की, मला विसरला .मझ्या प्रेमाला विसरला, मला दिलेल्या वचनाला विसरला .मझ्या साठी सोहम गेला होता ना, मुंबईला मग हे काय अंजलीच प्रकरण ...कोण ही अंजली, आणि हिच्या मुलाशी सोहम चा काय संबंध आहे . तो खरचं मला विसरला तर