स्पर्श - भाग 26 - अंतिम भाग

(84)
  • 18.4k
  • 1
  • 11.1k

मी तिला बाहूत घेऊन बेडवर नेईल अस तिला वाटत होत आणि नेमकं त्याच वेळी मी तिच्याकडे हसून म्हणालो , " मानसी ..तुला वाटलं की मला स्वतःला सावरन झालं नाही म्हणून मी रूम सोडून आलो तर चुकीची आहेस तू ..एक चूक तू त्याआधी पण केलीस ती म्हणजे जेव्हा पहिल्यांदा स्पर्श किळसवाणा वाटला तेव्हाच तू सांगायला हवं होतं . मला ते तुझं बोलणं आठवल म्हणून मी रूम सोडून आलो ..तुला एकदा स्पर्श करून पुन्हा त्याच अवस्थेत पुन्हा परत घेऊन जाण म्हणजे तुझ्या अस्तित्त्वावर घाला घालणं ..मी मुळात तुला चुकीच समजत नाही कारण तुझ्या जागी मी असतो तर मीही तेच केलं