जुळले प्रेमाचे नाते-भाग-७५।।

(21)
  • 9.5k
  • 2
  • 3.2k

"काय बोलतेस...?? प्राजु एवढं काही झालं आणि तुला आम्हाला एका शब्दाने सांगावस ही नाही का ग वाटलं.." प्रिया आणि वृंदा चांगल्याच भडकलेल्या माझ्यावर.. "अग काय आणि कोणत्या तोंडाने हे सांगायचं मी.. तो दिवस जरी आठवला तरी मला भीती वाटते. नको ग ते दिवस.. आणि त्या आठवणी..." मी डोळ्यातलं पाणी पुसण्याचा प्रयत्न करत बोलले.. जे अभिने पाहिलं आणि माझ्याजवळ येऊन तिने मला घट्ट मिठी मारली.. किती बर वाटतं नाही...!! जवळच्या व्यक्तींची ती मायेची ऊब... "गाईज आता तुम्ही तिला काहीच बोलु नका.. खरतर हे झालं तेव्हा तिने मला कॉल केला होता. मला ही अपेक्षा नव्हती की देवांश दादा एवढ्या खालच्या थराला जाईल.