सोलाह बरस की बाली उमर को सलाम...?? (भाग-1)

  • 6.9k
  • 2.5k

भाग 1 नेहमीप्रमाणे आजही अर्पिता दहा वाजता ताडकन उठली, ब्लँकेटमध्ये हात घालत इकडे तिकडे आपला मोबाईल शोधू लागली.. "हुश्श दहा वाजले तर... अरे यार मला आज लवकर उठायचं होतं, हा अलार्म पण ना, एवढी मोबाईलला चार्जिंग करते तरी वाजत नाही.." असं बोलत अर्पिता आपले अंथरूण उचलत म्हणाली आणि आईला पाहून थोडी घाई करू लागली. आई तिची घाई पाहत म्हणाली, "काय एवढी घाई करते आता?? झालं सकाळी सहा वाजल्यापासून उठवते तू उठेल तर...नुसता तो अलार्म लावते, अख्खं घर जागं होतं पण तू काय या कुशीवरून त्या कुशीवर पण हालत नाही.." , आई थोडी वैतागून बोलली. "अगं मग तू उठवायचं ना..," (अर्पिता डोळे