लग्न

  • 9.2k
  • 2.8k

आशा माहेरी लाडात वाढली असली तरी हुशार, कामसू आणि मनमिळावू होती. समोरचा प्रभावित होईल इतका छान स्वभाव होता तिचा. तिला बडबड करायला खूप आवडायचं. म्हणजे विषय कोणताही असो आशा त्यावरचं आपलं मत भरभरून मांडायची. अगदी एखाद्या विषयाची तिला काहीच माहिती नसली तरीही त्या विषयाला अनुसरून दुसरा एखादा नवाच विषय काढायची. सगळ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारी आशा सर्वांना आवडायची. अशी ही आशा लग्नापूर्वी नुकतीच उमललेल्या फुलाप्रमाणे नेहमी टवटवीत असायची. प्रत्येक मुलीच्या लग्नाबाबतीत वा भावी जोडीदारापासून काही अपेक्षा असतात. आशाही त्याला अपवाद नव्हती. आपलं लग्न थाटामाटात व्हावं, जोडीदार सज्जन आणि भरपूर प्रेम करणारा असावा असं तिला मनापासून वाटायचं. त्यानं येताजाता आपल्यावरचे प्रेम व्यक्त