तिच्या शब्दांत... माझ्या खूप प्रिय मैत्रिणीच म्हणजेच प्रांजल च लग्न होत. मला पत्रिका आली तशी माझा विश्वास च बसेना. तिला फोन करून खुप ओरडले की मला सांगितलं का नाही म्हणून. पण तिला डायरेक्ट सरप्राइज द्यायचं होत मला पत्रिका देऊन. ह्याच महिन्यातला शेवटचा मुहूर्त होता. मी खूप खूष होते पण परत मला त्याच शहरात, त्याच ठिकाणी, त्याच लोकांमध्ये नव्हत जायचं होतं जखमेवरची खपली काढायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचे प्रश्न ज्यावर मला उत्तर देता ही येत नाही आणि माझी मनापासून इच्छा सुद्धा नव्हती, फक्त प्रांजल मुळे मला जाण भाग होत. मी माझी आधीच सगळी तयारी करून ठेवण्याच्या विचारात होती उगाच ऐन