समर्पण - ८

  • 10.3k
  • 5.6k

समर्पण-८ ना तुम मेरे बन सकते हो, ना मुझे किसिका बनने देते हो। किस कश्मकश्म में जी रही हूं मैं, ना तो डुबने देते हो ना उभरणे देते हो। खूप विचित्र परिस्थिती मध्ये अडकली होती मी. बुद्धीला हे पटत होत की अभय च वागणं त्याच्या जागेवर बरोबर आहे पण मनाला मात्र विक्रम ची ओढ होती. जेव्हा जेंव्हा बुद्धी आणि मनात द्वंद होतं तेंव्हा आपण मात्र मनाचच ऐकतो. माझं ही तसच होतं. मनाला खूप समजावून सांगितलं की विक्रम फक्त मित्र आहे आणि अभय माझं सर्वस्व आहे. पण जेवढं विक्रम ला स्वतःपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला विक्रम तेवढ्याच जवळ येत होता माझ्या.