एक पत्र शेतकरी दादास

  • 12.6k
  • 2.7k

एक पत्र शेतकरी दादास! प्रति,प्रिय शेतकरीदादा,रामराम! तसे पाहिले तर तुला अनेक नावांनी संबोधले जाते. जगाचा पोशिंदा, अन्नदाता,मायबाप, दादा, मामा, काका, आजोबा अशी अनेक कितीतरी तुझी उपनामे आहेत. जवळची माणसे, मित्रपरिवार यांच्या शिवाय इतर सारे तुझा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेण्यासाठी गोड गोड शब्दांची बरसात करतात. खरे सांगू का दादा, तू की नाही अत्यंत भोळा आहेस कुणी साखरशब्दांची पेरणी केली, मनधरणी केली, खोटेनाटे वास्तव तुझ्यासमोर उभे केले की, तू त्या चक्रव्यूहात सापडून जवळचे सारे काही एक तर कुणाला तरी दान