तुझाच मी अन माझीच तू...भाग ७

(18)
  • 17.4k
  • 9.3k

तुझाच मी अन माझीच तू...भाग ७ आभा ला रायन बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती. पण राजस लगेच काहीच बोलणार नव्हता. "सांगतो ते ऐक ग... उगाच स्वतःला जास्ती भारी समजून वागू नकोस!! मी तुला सकाळीच सांगणार होतो की स्टे अवे फ्रोम रायन...आणि आत्ता पण सांगतो, जास्ती नादी लागू नकोस त्याच्या.. हे ऐक ग.. " "पण का?" "आज पहिला दिवस आहे तुझा.. कर की एन्जॉय!! इथे मस्त काम एन्जॉय कर.. बाकी कश्याच्या फंदात पडू नकोस!!" "ठीके.. मी इथे नवीन आहे सो ऐकते तुझ.. चलो.. माझ खाऊन झालं.. आता मी जाते.. थोड काम करून विल लिव्ह द ऑफिस.."