एक पत्र पुतळ्याचे

  • 7.3k
  • 2.1k

एक पत्र पुतळ्यांचे !प्रति, अतिप्रिय भक्तांनो, नाही. अभिवादन स्वरूप काहीही लिहणार नाही. कारण त्यावरून तुम्ही सरळ आमच्या जातीवर जाल. आम्हाला धर्माच्या वेष्टनात बांधून मोकळे व्हाल. नाही तरी आमच्यासारख्या महात्म्यांना, समाजसुधारकांना तुम्ही जाती-धर्मात वाटून घेतले आहेच. एक स्पष्टपणे सांगतो की, आम्ही सारे पुतळे एकत्रितपणे हा संवाद साधत आहोत. पाण्याला रंग नसतो परंतु धर्माला असतो. वेगवेगळे रंग देऊन तुम्ही जाती-धर्माची विभागणी केली आहे. नशीब पाण्याचे बलवत्तर की, तुम्ही अजून त्याला कोणता रंग दिला नाही. परंतु शिवाशिवीच्या जोखडात