मानसीच्या वागण्याने मी फारच दुखावलो होतो ..मनात तिच्याबद्दल शंका घर करून होती पण तिने त्याबद्दल सांगायला तोंड काही उघडलं नव्हतं ..कधी कॅनडा तर कधी भारत असा माझा प्रवास सुरूच होता त्यात कुठलाच बदल झाला नव्हता ..तिच्याशी बोलणंही तसच सुरू होत पण माझ्या बोलण्यातून ती शंका नेहमीच तिला जाणवत असे.. तरीही ती विषय बदलवून बोलणं सुरू ठेवू लागली ..तिने म्हटल्याप्रमाणे आम्हाला एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटायचा ..कधीही भेटलो की तासंतास बोलत बसायचो ..लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं ..मानसीच्या घरून नातवंडासाठी तिला विचारल्या जात होतं तर आमच्यात या एका वर्षात फक्त 4 - 5 वेळा शारीरिक संबंध झाले होते ..मुळात आम्ही