चंदू

  • 37.1k
  • 11.9k

"चंदू" आज रविवार. शाळेला सुट्टी. चंदू सातवीत होता. त्याने गृहपाठाच्या दोन वह्या आणि पुस्तकं थैलीत टाकली अन् बैलगाडीच्या खुटल्याला थैली लटकवली. आईचंही काम आटोपत आलं होतं. तिनं दुपारच्या भाकरी टोपल्यात टाकल्या. वावरात निघायला तयार झाली. बाबा आले. बैलगाडी जुंपली. चंदूने कासरा स्वतःच्या हातात घेतला. अन् गाडी दामटायला सुरूवात केली. बैलांच्या शेपटीला हात लागताच ती घोड्यासारखी पळू लागली. धाडधाड आदळत पळणाऱ्या बैलगाडीचा प्रवास अनुभवताना चंदू खळखळून हसत होता. प्रत्येक सुट्टीला चंदूचा हा नित्यनेम ठरलेला. आईबाबा शेतात निघाले की मागे लागणे. बैलगाडी पळवणे. शेतात खेळणे अन् थोडासा अभ्यास करणे. आजच्या दिवशीही ठरल्याप्रमाणे सगळं चाललं होतं. बाबांनी