मायाजाल-- ११ पोलीसांबरोबर आत आलेल्या हर्षदला बघून इंद्रजीत ताडकन् उठून उभा राहिला. " हर्षद तू? नाही! हे खरं नाही! तू --माझ्या जीवावर उठलायस? हे मी मान्यच करू शकत नाही." इंद्रजीतच्या तोंडून नीट शब्दही फुटत नव्हते. " आम्ही खात्री करून घेतली आहे. हे सगळे याचेच कारनामे आहेत. तुम्ही म्हणालात, की तुमच्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला. पण