भाग १४ आपला पद्धतशीरपणे छळ होतो आहे हे लक्षात येताच वसंताच्या खूप दिवस साठवलेल्या रागाचा प्रचंड स्फोट झाला! त्याचे कारणही तसेच होते,सलग दोन दिवस त्याला खायला काहीच मिळाले नव्हते! त्याने सुनंदाचा कानोसा घेत दोन तीन वेळा तिला खायला मागितले पण तिने सरळ दुर्लक्ष केले.आपल्याच घरात आपल्याला साधे जेवणही मिळू नये म्हणजे काय? अंदाज घेत तो स्वयंपाकघरात आला.अनेक दिवस त्याला हाताने काही घेऊन खायची वेळच आली नव्हती.पूर्वीच्या अंदाजाने जेथे स्वयंपाक करून ठेवलेला असायचा तेथे त्याने चाचपडत राहिला;पण त्याच्या हाताला काहीच लागले नाही.घरात सुनंदाने बरेच बदल केले होते,ते वसंताला माहीत असणे शक्यच नव्हते.अचानक तो भांडी ठेवण्याच्या फडताळावर जोरात आदळला.फडताळातली भांडी आवाज करून