नारळाच्या वड्या

  • 6.1k
  • 1.9k

सीमा खूपच घाईत घरातून बाहेर पडली. ऑफिसला आज उशीर होतो की काय असच वाटत होतं तिला सारखं..अविही आज लवकरच निघून गेला त्यामूळे हीला एकटीलाच मोपेड घेउन निघाव लागलं. आज कॉर्पोरेट ऑफिसची लोकं येणार होती त्यांच्या ब्रांचमधे भेट देण्यासाठी. तिने बरीच तयारी करून ठेवली होती कालच. प्रोजेक्ट मॉडेलही तयार केलं होतं दाखवायला. ती ऑफिसला आली आणि काही क्षणातच कॉर्पोरेट ऑफिसची लोकं आली. इतर विभागाची पाहणी करून ती सीमाच्या केबिन मधे आली. सीमाने त्यांना तिच्या प्रोजेक्टच मॉडेल दाखवलं आणि संपूर्ण तपशीलवार माहिती दिली. सर्वांनाच प्रोजेक्ट आवडला. सहमतीही मिळाली तिच्या प्रोजेक्टला. सीमा हुशार होती कामात त्यामुळे तीला दोनच वर्षांत बढती मिळाली होती ऑफिसमधे.सीमाला