स्पर्श - भाग 21

(28)
  • 14.2k
  • 9.7k

मानसी केवळ 4 दिवसासाठीच इथे आली होती आणि लगेच निघूनही गेली ..या चार दिवसात मला थोडे फार क्षण तिच्यासोबत जगता आले होते ..पण ती पुन्हा एकदा परतली आणि मी पुन्हा एकदा एकटा पडलो ..ती गेली पण माझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन ..खरच तिला चुकीच्या स्पर्शाला तर सामोरे जावं लागलं नव्हतं ना ?? ..आणि असेल तर मग तिने हे सर्वाना का सांगितलं नाही ? आणि न सांगता ती इतके दिवस राहू तरी कशी शकली ?? तिला यातना झाल्या नसतील का ? असे कितीतरी प्रश्न मला सतावत होते आणि नकळत डोळ्यात पाणी येत होतं ..आज मी जाणूनच मानसीला फोन केला नव्हता