एक पत्र सायकल या सखीला! प्रिय सखी... सायकल!ट्रिंग... ट्रिंग... हे घंटीच्या आवाजाने केलेले अभिवादन ! मी १५ आॅक्टोबर १९८१ या दिवशी केंद्रीय प्राथमिक शाळा खरवड ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे सहशिक्षक या पदावर हजर झालो. कळमनुरी ते खरवड हे अंतर तब्बल पंधरा किलोमीटर! त्या काळात ना ऑटो, ना जीप, ना अन्य कोणते खाजगी वाहन, सारा कारभार महामंडळावर अवलंबून! माझ्यासोबत माझी आजारी आई आणि तरूण बहीण त्यामुळे खेड्यात घर करणे शक्य नव्हते. सोबतचे दोन शिक्षक सायकलवर म्हणजे तुझ्या संगतीने जाणे