बहिण-भावाचे नाते हा अनमोल ठेवा आहे. तो सहजा सहजी मिळत नाही. आज बहिण भावाच्या नात्याबद्दल मनात आलेले बोल मांडण्याचा प्रयत्न करत आहे. रक्षाबंधन विशेष लेख ज्यावेळेस एखाद्या कुटुंबात नना राजकुमार जन्माला येतो. त्यावेळेस बहिणीचा आनंद गगनात मावेनसा होतो. त्या बाळाभोवती फिरणे, आई-बाबांना सतत आपल्या बापू बद्दल कुतूहल सांगणे, त्या बाळाला नाव काय ठेवायचे, कोणते ठेवायचे, इथपासून तयारी अगोदरच करते. ही बहीणच....! ज्यावेळेस मैत्रिणीसोबत बहिण खेळत असते. तेव्हा ती सतत आपल्या बापू साठी मी हे करीन, मी ते करीन, बापूला हा