१३. पुनरुत्थान (रिजरक्शन)...शक्ती माननीय पंतप्रधान यांच्या सोबत त्यांच्या रूमच्या बाल्कनीत उभा होता...त्यांच्या डोक्यावरून बिपीन शुक्लाला घेऊन आलेलं प्रायव्हेट जेट सगळ्या चांडाळ चौकडीला घेऊन दिल्लीच्या दिशेने झोकावलं होतं..."इथून पुढचा तपास आपली टीम सांभाळेल!" शक्ती वर त्या वायूवेग असल्याने गायब होणाऱ्या जेटकडे पाहत बोलला."शुक्ला नंतर काही बोलले?" शक्तीने विचारलं."हो. शुक्लावरील काही केसेस जनमानसने सत्तेवर आल्यावर बंद करण्याचं आश्वासन देऊन वर आरबीआय गव्हर्नर पदाचं लालूच दाखवून त्याला त्यांच्याकडं वळवून घेतलं होतं!" वर पाहत पीएमनी राहिलेल्या प्रश्नाचा पण खुलासा केला.काही वेळ दोघेही बोलायचे थांबले. मग..."तर इंद्रदत्त वाचस्पती यांच्या निर्णयानेच त्यांनाच सर्वनाश केला. आणि त्यांच्या उदात्त हेतूने जागा घेतली, ती निहित स्वार्थाने!" पीएमनी आकाशाकडून नजर