संत एकनाथ महाराज

  • 20.7k
  • 2
  • 6k

?संत एकनाथ महाराज..? ?पांडुरंग पांडुरंग.. श्री विठ्ठल हरी.. रामकृष्ण हरी.. मुकुंद मुरारी..?? पूर्वार्ध...✍️✍️?Archu? जिल्हा औरंगाबाद तालुका पैठण असलेल्या गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले पैठण ला संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा जन्म झाला.. पंधराशे 33 मध्ये पैठण या तीर्थक्षेत्री श्री संत भानुदास महाराजांच्या घरी झाला.. एकनाथ महाराज हे संत भानुदास यांचे पणतू होते.. म्हणजेच एकनाथ महाराज यांचे भानुदास महाराज पर पितामह होते.. त्यांची वंशावळ भानुदास.. चक्रपाणी... सूर्य नारायण..आणि त्यांचे पुत्र एकनाथ ..? भानुदास महाराज पैठण होऊन पंढरपुरास आले ..पण तिथे त्यांना देव दिसला नाही ..बिदरच्या राजांनी भगवंताला नेलं होतं.. बिदरऊन भगवंताला पंढरपूर आणण्याचे काम भानुदास महाराजांनी केले..यासाठी चार महिने संत पंढरपुरात राहिले..