नवनाथ महात्म्य भाग १८

  • 11.3k
  • 3.4k

नवनाथ महात्म्य भाग १८ नववा अवतार “चरपटनाथ” =============== चरपटनाथाच्या उत्पत्तीची अशी कथा आहे... पुर्वी पार्वतीच्या लग्नासमयी सर्व देव, दानव, हरिहर, ब्रह्मदेव आदिकरुन देवगण जमलेले होते. पार्वतीचे अप्रतिम लावण्य व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उप्तन्न झाला. तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन त्याचे वीर्य पतन पावले. तेव्हा ब्रह्मादेवास संकोच वाटला. त्याने ते वीर्य टाचेने रगडले. ते पुष्कळ ठिकाणी पसरले. त्यापैकी जे एका बाजुस गेले त्याचे साठ हजार भाग झाले व त्यापासुन साठ हजार वालखिल्य ऋषि निर्माण झाले. दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता. तो सेवकाने केर झाडुन काढला त्यात झाडुन गेला. पुढे लग्नविधीनंतर लज्जाहोमाचे भस्म व तो केर सेवकांनी नदीत