पत्र विठूमाऊलीचे !

  • 8.4k
  • 2.1k

एक पत्र... विठूमाऊलीचे! माझ्या प्रिय भक्तांनो, खूप खूप आशीर्वाद! कसे आहात? मजेत तर निश्चितच नसणार कारण गेली अनेक महिने त्या कोरोना नावाच्या महाभयंकर आजाराचे विषाणू पृथ्वीवर थैमान घालत आहेत. लाखो लोकांना या विषाणूने बाधित केले आहे, अंकित केले आहे तर हजारो लोकांना यमसदनी पाठवले आहे. त्याच्या तांडवामुळे हजारो कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. पित्याचे छत्र हरवल्यामुळे अनेक बालकं अनाथ झाली आहेत. कित्येक सधवा विधवा झाल्या आहेत. कैक वृद्धांची म्हातारपणीची काठी हिसकावून नेल्यामुळे त्यांचे हातपाय लटलट कापत आहेत त्यांनाही निराधार झाल्याची जाणीव बेचैन करीत आहे, अस्वस्थ करीत आहे. छोटेमोठे उद्योग ठप्प झाल्यामुळे