स्पर्श - भाग 18

(18)
  • 17.4k
  • 10.5k

ती कारमध्ये बसली ..तरीही तिची नजर मात्र वडिलांकडेच होती ..डोळ्यातुन अश्रू थांबायच नाव घेत नव्हते ..शेवटी रस्त्याला एक असही मोड आल की गाडी टर्न झाली आणि त्यानंतर लॉनमधील कुणीच दिसत नव्हत ..आमची गाडी समोर निघाली त्यामगोमाग सर्व गाड्या निघाल्या ..मामी आमचं स्वागत करण्यासाठी आधीच घराकडे निघाली होती ..कारमध्ये सोनाली , मी , मानसी आणि तिची ताई असे चौघेच होतो ...मला सातव वचन आठवलं आणि सोनलिकडे पाहत म्हणालो , " सोनाली मी चूक केली यार लग्न करून ..म्हटलं मुलगी सुंदर आहे इथे तर मेकअपचा कमाल होता ..बर मेकअपच सही पण रडून तो पण खराब करते ही बाई " ,