कादंबरी- जिवलगा ...भाग - ३३ वा

(20)
  • 16.1k
  • 7.7k

कादंबरी – जीवलगा भाग- ३३ वा ---------------------------------------------------------- नेहा निघाली ..जातांना तिला वाटत होते .. ती एक सुंदर परी झाली आहे..आनंदाचे पंख लावून निघालेली अधीर परी .. तिच्या ..जिवलगाच्या ..पहिल्या भेटीला ..अगदी आनंदी - हवेत तरंगत निघाली .. मनातून तिला देवाचे आभार मानायचे होते .. देवा ..हे स्वप्न प्रत्यक्षात खरे होऊ दे .. माझा जिवलग ..माझा होऊ दे .. त्याने बोलावे नि मी ऐकावे .. त्यच्या सगळ्या शब्दांना ,, माझा फक्त ..हो आणि हो ..हो चा .. गोड होकार ..असणार आहे. लिफ्ट मध्ये जातांना ..नेहाच्या कानात हेमू पांडेचे शब्द नाजूक घंटी सारखे किणकिणत आहेत असे वाटत होते .. किती वेगळे वाटावे