तंबूमधला शिनेमा !

  • 4.3k
  • 1.1k

“लोक हो sss, इकडे लक्ष द्या. आज रात्रौ ठीक दहा वाजता ‘अनिता टुरिंग टॉकीज’ येथे पाहायला विसरू नका दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांचा धमाल विनोदी चित्रपट - ‘पांडू हवालदार’.... याल तर हसाल न याल तर फसाल…” अशा जाहिरातीनी उभ्या मलकापूरचे कान टवकारले जायचे. एक माणूस भोंगामाईक आणि सायकल घेऊन सगळ्या मलकापूरभर पायपीट करत असे बडबडत फिरायचा. त्याच्या मागून तसेच सूर ओढत लहान मुलांचा लवाजमा असायचा. मग रिकामटेकड्या शौकीन रसिकांच्या उपस्थितीत सुमूहुर्तावर मुख्य बाजारपेठेत झाडावर सिनेमाचे सुरेखसे पोस्टर लटकायचे. पोस्टर बघून हुरहुर लागायची, मग लोकांना कधी एकदा तंबूत जातो आणि सिनेमा बघतो असं होऊन जायचं! हे 'अनिता टुरिंग टॉकीज' म्हणजे