दोन टोकं. भाग २२

(19)
  • 10.8k
  • 5.9k

भाग २२ विशाखा पटपट आवरून बाहेर आली आणि सोफ्यावर उडी मारली," काका....... काका....... "काका हातात प्लेट घेऊन बाहेर आला, " घसा फाडण्यात येऊ नये. नाष्टा आणलेला आहे. " " ओह थँक्यु काका ☺️ . आय लव्ह यु काका ? " " ??? " " काय झालं असं बघायला ☹️ " " तेच मी तुला विचारायला पाहिजे की काय झालंय तुला " " मला ? . मला कुठे काय .. काहीच तर नाही. " " मग एवढं गोड गोड का बोलतीये ? " " गोड गोड म्हणजे ? " " सवय नाहीये गं बाई असं गोड गोड ऐकण्याची. ४ शिव्या दे पण असं नको बोलत जाऊ. धडकी भरते मला. " " ??