परवड भाग ११

  • 8.8k
  • 4.3k

भाग ११“आजच देशमानेशी आपल्या लग्नाबद्दल चर्चा करायची.थट्टा करता करता आपल्याला त्यांनी आपल्या सुखी भविष्याचा मार्ग दाखवला आहे!” विचारांच्या तंद्रीतच अरविंदा ऑफिसला पोहोचला.त्याने देशामानेना ताबडतोब भेटायला बोलावले. काल ज्या हॉटेलात त्यांनी चहा घेतला होता तेथेच देशमाने अरविंदाला भेटायला आले.अरविंदा आज भलताच खूष होता ....खूप दिवसानंतर आज अरविंदांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते.अरविंदाचा तो खुललेला चेहरा बघून देशमानेना खूप बरं वाटलं." काय अरविंदा काय विशेष? आज आनंदात दिसताय? "देशमाने अरविंदाकडे बघत मस्करीच्या मूडमध्ये बोलले..." काही नाही असंच!"" अरविंदा मी आज ओळखतो का तुला? तुझा चेहरा वाचायची मला एवढी सवय झालीय की न बोलताच तुझे मन मला वाचता येते! नक्कीच काहीतरी छान घडलं आहे किंवा