स्पर्धेचे तीन क्रमांक जाहीर होणार होते, सुरवात तिसऱ्या क्रमांकाच्या घोषणेने झाली. समीक्षकांनी त्यांच्या हातातल्या पेपर वर नजर फिरवली आणि बोलले. “तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत आर्थोपेडिक आणि स्पाईन फिल्डचे डॉक्टर बिपीन सोलंकी" टाळ्यांचा कडकडाट झाला, बिपीन सोलंकी ने झाडाचे खूप छान चित्र काढून त्याच्या खोडाच्या जागी पाठीच्या मणक्याची रचना करून मणक्याचे महत्त्व आणि त्याची निगा राखणे आणि त्यासाठी योग्य ते उपचार घेणे किती गरजेचे आहे हा संदेश त्यांच्या चित्रातून दिला होता. "दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत अनिल गोरे ज्यांनी सायकॅट्रिक क्षेत्राचे प्रभुत्व केले आहे" टाळ्या वाजल्या आणि सगळ्यात जोरात आणि खुश होऊन डॉक्टर माधव ने टाळ्या वाजवल्या "आणि पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत