कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग -१८ वा. --------------------------------------------------------------------------- अविनाश जळगावकर यांच्या पाठोपाठ अनुषा केबिनमध्ये आली खरी ..पण आतले केबिन इतके भव्य -डोळे दिपवून टाकणारे असेल याची तर कल्पना केली नव्हती . ते नंतरही पाहता येईलच की ,असा विचार तिच्या मनात येऊन गेला . खरे म्हणजे आतल्या जागेत फक्त केबिनच नव्हते , तो एक मोठा हॉलच होता , त्याचे दोन तीन भाग करून त्यात सुरुवातीला अतिशय आकर्षक वाटणारी साहेबांची केबिन , त्याच्या उजव्या बाजूला पुन्हा काचेचे दालन .. ज्यात बाहेरून आत काय चालले आहे हे पाहता यावे अशी व्यवस्था होती . एकच वेळी पन्नास ते शंभर माणसे बसू शकतील असा